| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
धर्मा मोटर्सचे मालक चेतन घोगले यांनी चंदरगाव आदिवासीवाडी येथे संगणक उपलब्ध करुन दिले. आदिवासी दुर्गम भागात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी संगणकावर आधारित तंत्रज्ञान कौशल्याचा विकास करण्यासाठी इतर समाजातील मुला मुलींसोबतच आदिवासी मुलांनादेखील संगणकाचे शिक्षण घेता येईल, या उद्देशाने सदरची बाब मनसे सुधागड तालुका उपाध्यक्ष केवळ चव्हाण यांनी धर्मा मोटर्सचे मालक चेतन घोगले व रोशनी घोगले यांच्या कानावर टाकली असता लगेच संगणक उपलब्ध करून दिले.
विद्यार्थ्यांना संगणक आणि तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान देऊन करिअरच्या संधी वाढविण्यासाठी रोशनी घोगले यांनी मुलामुलींना आठवड्यातून दोन दिवस मोफत संगणकाचे प्रशिक्षण देणार असल्याचेदेखील सांगितले. आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा, तसेच शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी धर्मा मोटर्सचे मालक चेतन घोगले व रोशनी घोगले यांच्याकडून आर्थिक मदत ही केली जाणार असल्याचे आश्वासित केले. यावेळी गावकरी व केवळ चव्हाण यांनी धर्मा मोटर्सचे आभार मानले.