वाढत्या रुग्णसंख्येवरुन पंतप्रधानांकडून चिंता

आढावा बैठकीत मार्गदर्शन
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
वाढत्या कोरोना वाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून,साथ आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी सर्व यंत्रणेला दिलेले आहेत.
मोजी यांनी रविवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यासाठी अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील ही वाढ दिवसेंदिवस होतच आहे. अनेक शहरांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव वाढला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमधील निवडणूक वेळापत्रकाची घोषणा या पार्श्‍वभूमीवर ही चिंता आणखी वाढली आहे. सध्या 15 ते 18 वयोगटातील किशोरांचंही कोरोना लसीकरण केलं जात आहे, तर 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचे डोस उपलब्ध असणार आहे.

ओमिक्रॉनची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच या मतदानाच्या राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत प्रत्यक्षातील प्रचाररॅलींवर बंदी घातली आहे. आयोगाच्या पुनरावलोकनानंतर ही बंदी उठू शकते, परंतु एउ चा प्रचार कर्फ्यू रात्री 8 नंतर कायम राहणार आहे.

Exit mobile version