| पनवेल | प्रतिनिधी |
दिवसेंदिवस वाढती अपघात संख्या यास कुठे तरी आळा बसावा, या उद्देशाने केंद्रीय शासनातर्फे दरवर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतो. त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर करण्यात येते विशेषतः पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्फत विविध उपक्रम राबऊन अंमलबजावणी करण्यात येते. याच उद्देशाने पनवेल आरटीओतर्फे विविध शाळांमधील आरएसपीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविले विविध उपक्रम पनवेल प्रादेशिक परिवहन विभाग पनवेल मार्फत प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्या नेतृत्वात रोहित कोलप, अशोक वारे, प्रा. राजेंद्र पालवे, विलास पाटील यांच्या सहकार्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूल कळंबोली येथे 1 ते 31 जानेवारी दरम्यान राबविण्यात आले. अभियानात विविध शाळांमधील विविध आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करून सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. सदर रॅलीच्या माध्यमातून वाहतूक सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांनी घोषणा देत हाती घोषवाक्य फलक, पथनाट्य सादर करण्यात आले सुधागड हायस्कूल कळंबोली येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चित्रकला, निबंध, तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजन करून सहभागी सर्व विद्यार्थ्या प्रशस्तीपत्रक व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक विद्यार्थ्यांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करून याविषयी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेऊन अंमलबजावणी करण्यात आली. 1 जानेवारीपासून सुरू झालेल्या 37 व्या रस्ता सुरक्षा अभियानाची सांगता 31 जानेवारी रोजी सांगता करण्यात आली. अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी पृथ्वीराज काकडे यांनी नियोजन केले व त्याची अंमलबजावणी सुधागड हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र पालवे, विलास पाटील यांनी केले. त्यांना पुनम कांबळे, खेडकर, एल. व्हि पाटील, विकास नाईक यांनी सहकार्य केले.







