| महाड | वार्ताहर |
महाड तालुक्यातील गोंडाळे येथील वाडीवर बंधार्याचे काम सुरू असताना काँक्रीटचा मिक्सर अंगावर पडून अपघात झाला. या अपघातामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक कामगार जखमी झाला आहे.
महाड तालुक्यातील बोंड आळी देऊळकोंड येथे जलसंधारण विभागाचे बंधार्याचे काम सुरू असताना मंगळारी (दि.26) काँक्रीट मिक्सर पलटून झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. मैनूद्दिन अन्सारी ( वय 19) रा. मध्य प्रदेश, असे मयताचे नाव असून सुमित धाणे हा या अपघातात जखमी झाला आहे. या अपघातानंतर तालुक्यात सुरू असलेल्या विविध शासकीय बांधकामांवरील तसेच खासगी बांधकामांवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







