नेरळ कळंब रस्त्याच्या काँक्रिटकरणा सुरु

| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ कळंब भागातील अत्यंत खराब असलेल्या भागातील रस्त्याचे काँक्रिटकरण करण्यात सुरुवात झाली आहेे. माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्ता खोपोली कर्जत मुरबाड शहापूर या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला जाऊन मिळत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा समजला जातो. या रस्त्यावर कोल्हारे ग्रामपंचायत मधील साई मंदिरापासून धामोते पर्यंत असलेला रस्ता खोलगट असल्याने पावसाळ्यात पाणी साठत असते.

त्यामुळे स्थानिक वाहनचालक हे पावसाळ्यात रस्त्यावरून वाहत जाणार्‍या पाण्यामुळे अडकून पडायचे आणि त्यामुळे स्थानिकांनी या भागातील रस्त्याचे आरसीसी काँक्रिट करावे अशी मागणी केली जात होती.शेवटी माथेरान नेरळ कळंब रस्त्यावरील धामोते धनेश्‍वरी मंदिर ते विद्या भवन शाळा या भागातील रस्त्यावरील रस्त्याच्या काँक्रिटकरण कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता धनेश्‍वरी मंदिर पुढील भागातील रस्त्याचे काँक्रिटकरण करण्याचे काम मार्च 2023 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे.

रस्त्याच्या खाली असलेली जमीन ही पाणी असलेली जमीन असून त्या चिकट प्रकारच्या जमिनीवर असलेला रस्ता हा पावसाळ्यात कायम खराब होत असतो.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पडण्याचे प्रकार सतत होत असतात. त्यामुळे या भागातील रस्त्यावर डांबरीकरण ऐवजी काँक्रिटकरण करण्यात येत आहे.

संजीव वानखेडे सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता
Exit mobile version