नेरळ – लोभेवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील नेरळ पिंपळोली सुगवे लोभेवाडी या राज्यमार्ग रस्त्यावरील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण कामासाठी तब्बल सात कोटींचा निधी मिळाला होता. दरम्यान, अतिक्रमण दूर करून हा रस्ता बनविण्यात आला असून कोल्हारे ग्रामपंचायतमधील मुख्य रस्ता काँक्रीटचा बनल्याने येथील व्यापार उद्योग वाढण्यास मदत होणार आहे.

माथेरान नेरळ कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरून साई मंदिर कोल्हारे येथून नेरळ, पिंपळोली, तळवडे, सुगवे लोभेवाडी असा राज्यमार्ग रस्ता जातो. या रस्त्यावरील साईमंदिरपासून कोल्हारे आदिवासी वाडी पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला होता. साई मंदिर पासून बोपेले गाव आणि पुढे कोल्हारे आदिवासी वाडी या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले असून या दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. त्यात दोन ठिकाणी स्वागत कमानी होत्या. तसेच अनेक ठिकाणी रस्त्याच्या जवळ होती. ती सर्व अतिक्रमणे दूर व्हावीत यासाठी सामूहिक प्रयत्न झाले आणि त्यानंतर कोल्हारे ग्रामपंचायत मधील हा महत्वाचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याला अगदी वेळेत पूर्ण करता आला आहे.

Exit mobile version