खालापूर तालुक्यात कालव्याची दुरवस्था; शेकडो हेक्टर जमीन नापीक,शेतकरी चिंताग्रस्त

। पाताळगंगा । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील कालव्यांची दुरवस्था झाली असून, माजगांव,आंबिवली,वारद,पौध तसेच या परीसरातील जोडणा-या आदिवासी वाड्या असून अजुन कालव्याला पाणी न आल्यांने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. या परिसरात शेकडो हेक्टर असून शेतकरी या जमिनितून भाताचे उत्पन्न घेत असतात.परंतू कालव्याचे पाणी नियोजित वेळेवर पोहचत नसल्यामुळे उन्हाळी भात लागवड होऊ शकलेली नाही.
गेल्या तीन चार वर्षापासून कालव्याचे पाणी शेतीपर्यंत पोहचले नाही.शिवाय कालव्यची दुरवस्था यामुळे भात पेरणीपासून ते लागवडीपर्यंत पाण्याची खूप आवश्यक असते.मात्र कालव्याची दुरवस्था झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गांनी भात लागवड कडे पाठ फिरविली आहे.
कालव्याला अवस्था बिकट झाली असल्यामुळे पाणी हवे तेवढे शेतीला मिळत नसल्यांची खंत शेतकरी शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.कालव्याला पाणी सोडण्याचे म्हटले की साफ सफाई आगोदर करणे गरजेचे आहे.तसेच हा कालवा अंदाजे दहा ते बारा किलो.मीटर असल्यांने हा साफ होण्यासाठी वेळ लागणार,शिवाय हे पाणी सोडण्याच्या लोखंडी पाईपची अवस्था बिकट झाल्यांने त्या जागी प्लास्टिकचे पाइप टाकण्यात आले आहे.मात्र त्याची ही दुरवस्था निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी नविन लोखंडी पाईप बसविण्यात आले मात्र ज्या ठिकाणी पाणी कालव्यात सोडले जाते.त्यांची सुद्धा दुरावस्था असून, कालव्याला काही ठिकाणी मोठे भगदाड पडेले आहे.या सर्व बाबीवरुन कालव्याला पाणी शेवटपर्यंत जात नसल्यामुळे कालवा दुरुस्त झाला नसल्यामुळे या वर्षी कालव्याला पाणी आलेच नाही.


खरसुंडी येथून वाहत येणारा कालवा मात्र,आता पाण्यावाचून कोरडे पडले आहे. कालवा दुरुस्ती साठी काही निधी उपलब्ध झाल्याचे समजते.मात्र कालव्याचे काम मात्र झाल नाही.या ठिकाणी लोखंडी पाईप नविन टाकण्यात आले.मात्र कालव्याला दुरवस्था आज ही त्याच स्थितीत असल्यामुळे आज शेकडो हेक्टर जमीन नापिक होत चालली आहे.

राजेश पाटील,माजी उपसरपंच

कालव्याचे पाणी शेतीला आले असते तर शेकडो हेक्टर जमिन नापिक झाली नसती.हे पाणी येत असल्याने गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागत असून काही अल्प भुधारक भाजीपाला लागवड करीत आहे सदर कालव्याला पाणी येत नसल्यामुळे अथिक बजेट कोलमडले आहे.

( रवि काठावले – शेतकरी माजगांव )

Exit mobile version