उरणमधील शासकीय इमारतीची दुरवस्था

पावसाळ्यात संगणक, कागदपत्रे भिजण्याचा धोका
। उरण । वार्ताहर ।

उरण पंचायत समितीच्या इमारतीवरील पत्र्याची दुरवस्था झाली आहे तसेच नगर परिषदेच्या इमारतीवरील कौलांची दुरवस्था झाली आहे. तसेच इतर इमारतींच्या छताना छिद्र पडल्याने पावसाचे पाणी झिरपून कार्यालयातील संगणक व महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी सदर इमारतीच्या छतावरील पत्र्याची, कौलांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी आहे.


उरण शहर, तालुक्यातील गावोगावच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्याचे तसेच सदर विकास कामांना मंजुरी देण्याचे काम हे उरण नगर परिषद व उरण पंचायत समितीमधून केले जात आहे. शहरातील, तालुक्यातील जनमानसांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे ही काम उरण नगर परिषद व उरण पंचायत समिती आणि पोलीस ठाण्यासह इतर शासकीय इमारतीच्या कार्यालयातून केले जात आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सदर शासकीय कार्यालयात पावसाचे पाणी झिरपत असल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. त्याचा तास हा शासकीय कार्यालयात कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांना व कार्यालयात ये-जा करणार्‍या नागरीकांना सहन करावा लागला होता.


यावर्षी पावसाचे आगमन हे लवकरच असल्याचा भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहे. परंतु शासकीय कामकाज करणार्‍या आप आपल्या शासकीय कार्यालयातील इमारतीच्या छतावरील पत्र्याची कौलांची दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील, तालुक्यातील सर्रास शासकीय कार्यालयातील इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी झिरपून कार्यालयातील संगणक बंद पडून इंटरनेट सेवा कोलमडून पडेल. तसेच महत्त्वाची कागदपत्रे भिजण्याचा धोकाही आहे.

Exit mobile version