पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अटीत शिथीलता ; शासनाचे नवे परिपत्रक

आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना अखेर यश
। चिपळूण । वार्ताहर ।
महापूरानंतर चिपळूणसह इतर शहरांसाठी राज्य शासनाने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना मदत जाहीर केली होती. परंतू अनेकांची मदत नियम,अटी आणि कागदपत्रांत अडकली होती. आज शासनाने नवा निर्णय घेवून सुधारित परिपत्रक जारी केले आहे यासाठी चिपळूण व संगमेश्‍वर तालुक्याचे आमदार शेखर निकम यांनी विशेष प्रयत्न केले, त्यामुळेच व्यापारी व छोटे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे आता व्यापार यांना मोठा दिलासा मिळाला आहे आज जारी करण्यात आलेल्या आदेशात काही शिथील ल करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये दुकानदारांकडे जर आस्थापना परवाना नसेल तर अन्न व औषध प्रशासन देणारे प्रमाणपत्र अथवा केंद्र सरकारच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाकडून दिले गेलेले आधार (ब) प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र महाराष्ट्र अधिनियम 2े17 नुसार नोंदणी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 20 नमुना ग प्रमाणे सूचना देण्यात आलेली पावती अशा प्रकारचा कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल ही शीथलता दुकानदारांसाठी देण्यात आलेले आहे जे टपरीधारक आहेत यांचे नाव स्थानिक मतदार यादीत व रेशन कार्ड वर आहे परत अशा टपरीधारकांना प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत मदत देण्यात यावी असे परिपत्रकात म्हटले आहे.त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत कडील हातगाडी लायसन वा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वसूलची दैनंदिन सामान्य पावती, स्थानिक स्वराज्य संस्थेतकडून उन्हाळी तात्पुरता व्यवसाय करण्यात देण्यात येणारी परवानगी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेकडून खाजगी व सार्वजनिक जागेवर जे व्यवसाय करतात त्यांच्याकडून वसूल करण्यात येणारे दर्शनी भूभाडे पावती यापैकी एक पुरावा सादर केल्यानंतर मदत मदत देण्यात येईल असे म्हटले गेले आहे.
शासनाने अशा प्रकारच्या कागदपत्रांमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व काही पर्याय उपलब्ध केल्याने आता चिपळून शहर व परिसरातील व्यापार्‍यांना व दुकानदार तसेच टपरीधारकांनी ना मदतीचा मधील अडसर द दूर होईल. गेले अनेक दिवस या विषयावरून व्यापारी व छोट्या व्यावसायिकांमध्ये प्रचंड नाराजी होती व हे लक्षात घेऊनच आमदार शेखर निकम यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसेच पालकमंत्री अनिल परब तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व रायगडचे पालकमंत्री अनिल तटकरे यांच्याकडे ही मागणी लावून धरण्यात आली सहकार्याने प्रशासनाने आज हा आदेश जारी केला आहे व आ.निकम यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version