| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मुळे येथील बाळाराम तुकाराम घरत यांचे वृध्दापकाळाने शुक्रवार (दि.12) रोजी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 78 वर्षे होते. त्यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते राजेश घरत यांचे ते वडील होते. शेतकरी कामगार पक्षाच्या माहिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी घरत कुटूंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
बाळाराम घरत हे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते होते. समाजकारणासह राजकारणात ते सक्रीय होते. शेतकरी कामगार पक्षाचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. बाळाराम घरत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, वरसोली ग्रामपंचायतचे उपसरपंच मिलिंद कवळे, वरसोली ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश घरत, सुजय घरत, हर्षल नाईक, सतीश म्हात्रे लोणारे, मुळे गावचे शेकाप ज्येष्ठ नेते नामदेव पाटील, रमेश पाटील, संतोष पाटील, महेश गायकवड वाडगाव, खंडाळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच नशिकेत कावजी आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, ग्रामस्थ, व नातेवाईक उपस्थित होते.
बाळाराम घरत यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार (दि.21) रोजी होणार असल्याची माहिती घरत कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.