| चिरनेर | प्रतिनिधी |
शेलघर येथील रामनाथ विठ्ठल भगत यांचे रविवारी (दि.4) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर शेलघर येथील स्मशानभूमीत नातेवाईक व ग्रामस्थांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या निवासस्थानी जाऊन भगत कुटुंबियांचे सांत्वन केले. शेकापक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा शेलघर गावचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत विठ्ठल भगत यांचे ते चिरंजीव, तर शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत यांचे ते बंधू होत. रामनाथ भगत हे अण्णा या नावाने पंचक्रोशीत सुपरीचित होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवारी (दि.13) श्रीक्षेत्र नाशिक येथे होईल. तर, उत्तरकार्य विधी शुक्रवारी (दि. 16) शेलघर येथील राहत्या घरी दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.







