आ. जयंत पाटील यांच्याकडून रमेश पाटील परिवाराचे सांत्वन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कृषी उत्पन्न बाजार समिती अलिबागचे माजी उपाध्यक्ष रमेश बाळकृष्ण पाटील यांच्या निधनाबद्दल शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी पाटील परिवाराचे रामनाथ (किहीम) येथील निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी रमेश पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासमवेत अन्य मान्यवर उपस्थित होते.

रमेश पाटील यांनी सरखेल कान्होजी आंग्रे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. किहीम-चोंढी संस्थेचे संस्थापक, माजी अध्यक्ष, महर्षी मजूर सहकारी मर्या. किहीम संस्थेचे संस्थापक, माजी अध्यक्ष, चामुंडा देवी विश्‍वस्त ट्रस्ट किहीमचे मुख्य विश्‍वस्त, कृषी उत्पन्न बाजार समिती अलिबाग माजी उपाध्यक्ष, कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग संस्थेचे माजी सल्लागार, कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे कार्यकारी सदस्य, जय भवानी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कामथचे संस्थापक आदी विविध संस्थांवर काम केलेले होते. त्याचप्रमाणे युसुफ मेहेरअली सेंटर तारा यांच्या संयुक्त सौजन्याने अनेक वर्षे किहीम या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र चालविले आणि गावोगावी आरोग्य शिबिरे घेतली. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे.

Exit mobile version