चित्रलेखा पाटील यांच्याकडून सांत्वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते गिरीष पाटील यांचे नुकतेच निधन झाले. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन गिरीष पाटील यांच्या पत्नीसह कुटूंबाची विचारपूस करून सांत्वन केले.

यावेळी मुळेच्या सरपंच सुहानी पाटील, रंजना पाटील, मानतर्फे झिराडचे सदस्य जयेश पाटील, प्रज्योत पाटील, महिला, कार्ले येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते, गिरीष पाटील यांचे भाऊ रुपेश पाटील व कुटुंबिय उपस्थित होते. गिरीष पाटील यांच्यावर किरकोळ कारणावरून हल्ला करून त्यांना तिघांनी जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कार्ले येथील त्यांच्या घरी गेल्या. गिरीष पाटील यांची पत्नी स्नेहल पाटील यांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.

Exit mobile version