| अलिबाग | प्रतिनिधी |
शेकापच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन शुक्रवार (दि.29) मार्च रोजी निधन झाले. निधनाची माहिती मिळताच वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा पत्रकारिता अशा अनेक दिग्गज मंडळींकडून पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले जात आहे. मंगळवारी (दि.2) राजकीय पुढाऱ्यांनी पाटील कुटूंबियांची भेट घेत त्यांची विचारपूस करून सांत्वन केले.
काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पेझारी येथील सुशीला सदन निवासस्थानी येऊन माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, दहिसरच्या आ. मनीषा चौधरी, शिरूरचे आ. अशोक पवार, माजी आ. धैर्यशिल पाटील, आ. राहूल कुल, सुनिता नाईक, अलिबाग नगर परिषदेचे सर्व माजी नगरसेवक, ॲड. प्रसाद पाटील, ॲड. श्रध्दा नाईक, दत्ताजी म्हसूरकर, योगेश मगर, केळबा पाटील, बाबासाहेब पाटील, सरदार पाटील, क्रांतीसिंह पाटील, कुमार पाटील, सुनील शेळके, गुड मॅनिंग ग्रुप पेझारीचे सर्व सदस्य यांनी पेझारी येथे जाऊन पाटील कुटूंबियांची भेट घेतली.
यावेळी आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस व मीनाक्षी पाटील यांचे सुपूत्र ॲड. आस्वाद पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, सरपंच सुमन पाटील, आदी मान्यवरांसह शेकापचे पदाधिकारी, चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.