| पेझारी । वार्ताहर |
अलिबाग तालुक्यांतील पेझारी आंबेपूर नविन वसाहत येथील रहिवाशी व पोयनाड हायस्कूलचे माजी शिक्षक तुकाराम दिनकर पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील यांचे 30 मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षांचे होते. त्या पेझारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी आपले शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्दीत अनेक विद्यार्थी घडविले. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालयात कार्यरत असणारे संदेश तुकाराम पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांचे मृत्यूची बातमी कळताच जिल्हा परिषदेच्या सदस्या भावना पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर, मंदार वर्तक, कर्मचारी वृंद तसेच अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तर अलिबाग मुरुड-रोहा मतदार संघाचे माजी आ. पंडीत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, माजी जि.प. सदस्या चित्रा पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील, सवाई पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी येऊन सात्वन केले. त्यांचेवर आंबेपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यांत आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील तसेच ग्रामस्थ, परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांचे मागे त्यांचे पती टी.डी. पाटील, मुलगे संदेश, संतोष, निनाद, पराग, नातू, पणतू असे मोठे कुटूंब आहे. त्यांचा दशक्रिया विधी 7 एप्रिल रोजी तर उत्तरकार्य तेरावा 10 एप्रिल सोमवार राहते घरी होणार आहे.