| रोहा । प्रतिनिधी ।
स्व. हरीभाऊ म्हसकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी (दि.10) सकाळी 10 वाजता नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात पुगाव जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन माजी आ. पंडीत पाटील यांच्या हस्ते होणार असून पुगाव बौद्धवाडी सभामंडपाचे उदघाटन माजी बांधकाम सभापती निलिमा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
रविवार (दि.11) शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे व पुगाव सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा सकाळी 10 वाजता संपन्न होणार असून, या कार्यक्रमाला माजी आ. धैर्यशील पाटील, शिक्षक आ. बाळाराम पाटील, शंकरराव म्हसकर, रोहा तालुका चिटणीस राजेश सानप, जिल्हा बँक संचालक गणेश मढवी यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.