राज्य कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन

महाराष्ट्रातील 19 केंद्रावर परीक्षा
| मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशचच्यावतीने राज्य पंच मंडळाच्या मार्गदर्शनाखाली रविवार (दि.25) सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 19 केंद्रावर राज्य पंच परीक्षा घेण्यात येणार आहे. या 19केंद्रावर अंदाजे 800 परीक्षार्थी ह्या परीक्षेस बसणार आहेत. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, देवरुख-संमेश्‍वर, लांजा, दापोली अशी सर्वाधिक चार केंद्रावर परीक्षा होईल. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, जळगांव, धुळे, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, परभणी, पालघर या अन्य 15 केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

मिनानाथ धानजी, सतीश सूर्यवंशी, अलेक्झांडर मणी, बी.जे.पाटोळे, निवृत्ती आजगेकर, सदानंद माजलकर, रवींद्र म्हात्रे, रोहिणी अरगडे, संगीता मोरे, प्रा. नवनाथ लोखंडे, लक्ष्मण मोहिते, राजेंद्र अनुभवणे, योगेश यादव, मालोजी भोसले, नितीन कदम, भरत मुळे, सूर्यकांत कदम, सुहास पाटील, सुरेश जोशी, विनोद पाटील, संजीव मोरे, लक्ष्मण बेल्लाळे आणि शशिकांत राऊत हे पर्यवेक्षक या केंद्रांवर लेखी, तोंडी आणि मैदानी प्रात्याक्षिक परीक्षा घेतील. सकाळी 9-00 ते 12-00 या कालावधीत लेखी, त्यानंतर तोंडी व मैदानी प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चा अधिकृत परीक्षा प्रवेश अर्ज भरल्याशिवाय कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही. या परीक्षेस बसलेल्या सर्व परिक्षार्थीनी दिलेल्या वेळेच्या 15मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहाणे आवश्यक आहे, असे एका परिपत्रकाद्वारे राज्य कबड्डी असो.चे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी कळविले आहे.

Exit mobile version