राज्यस्तरीय बुद्धीबळ निवड चाचणीचे आयोजन

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेच्या निवड चाचणीचे अकोल्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित अकोला महानगर डिस्टीक्ट चेस असो. व प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्तपणे आयोजित ही निवड चाचणी दि. 20 व 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापासून प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड अकोला येथे होणार आहे.

या चाचणीत मुलामुलीसाठी 7, 9, 11, 13, 15, 19 असा वयोगट ठेवण्यात आला आहे. 20 जुलै रोजी 7, 11, 15 व 19 वर्षाखालील गटातील स्पर्धा होऊन दि.21 जुलै रोजी 9, 13 व खुल्या गटातील स्पर्धा होणार आहेत. यामध्ये 7, 9, 11, 13 वर्षाखालील वयोगटात प्रथम दोन मुलामुलींची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार असून 15 व 19 वर्षाखालील गटात व खुल्या गटातील प्रथम चार मुलामुलींची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ अकोला जिल्हातील खेळाडूंसाठी असून, यात सात वर्षाखालील गटात 1 जानेवारी 2017 नंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकतात. नऊ वर्षांखालील गटात 1 जानेवारी 2015 च्या नंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकतात तर, 11 वर्षाखालील गटात 1 जानेवारी 2013 नंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकणार आहेत. 13 वर्षाखालील गटात 1 जानेवारी 2011 नंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकतात.15 वर्षाखालील गटात 1 जानेवारी 2009 च्या नंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकतात तर, 19 वर्षाखालील गटात 1 जानेवारी 2005 च्यानंतर जन्मलेले खेळाडू खेळू शकतात. या स्पर्धेसाठी एमसीए नोंदणी असणे आवश्यक असून, खेळाडूंनी वयाचा पुरावा आणणे आवश्यक आहे.

नाव नोंदविण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2024 आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी स्पर्धकांनी अकोला महानगर डिस्टीक्ट चेस असोसिएशनचे सचिव जितेंद्र अग्रवाल यांच्याशी अथवा संदीप पुडंकर यांच्याशी संपर्क करून या स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभात क्रिडस स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, संदीप पुंडकर, जितेंद्र अग्रवाल यांनी केले आहे.

Exit mobile version