| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील रासळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 176 रुग्णांनी लाभ घेतला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी अध्यक्ष संतोष शिंदे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील नामवंत डॉक्टर श्रीपाद बोडस व त्यांच्या पत्नी डॉ. अंजली बोडस, पल्लवी लेले, डॉ. अर्चना जोशी यांच्यासह मेडिकल सर्जिकल नर्सेस प्रिया शिंदे, प्रिया तळगावकर, डॉ. मोनाली इंगळे, डॉ. ज्योती पेरके व तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे मोहन तेलंग, सुमीर सहानी, श्रद्धा पै, कांचन लिमये, ग्लेन नंदा, खजिनदार योगेश सोवानी, दादासाहेब सत्रे, अमित देशपांडे, पारुल देशपांडे, राजेश बामणे, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे समन्वयक बळीराम निंबाळकर सर, सल्लागार रमेश सागळे, उपखजिनदार विजय जाधव, राकेश थोरवे, भगवान तेलंगे, अजय जाधव, रवींद्र सागळे, पत्रकार दत्ता दळवी, रासळमधील शाळेचे मुख्याध्यापक शरमरकर, अजित जगताप, प्रेमकांत खाडे, रासळ येथील बल्लाळेश्वर पेट्रोल पंपचे मालक प्रवीण तानाजी खाडे आदींचे विशेष सहकार्य लाभले. तसेच रोट्रॅक्ट क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी अध्यक्ष वैष्णवी जैस्वाल, क्षितिज माने या तरुणांनीही उत्साहाने सहकार्य केले.