पीएनपी महाविद्यालयात इंटरव्यू पासिंग कार्यशाळेचे आयोजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या पीएनपी स्किल्स व सिटीएमसि ऐकेडेमी मुंबई यांच्या संयुक्तविद्यमाने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनसाठी मोफत इंटरव्यू पासिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनास सीएमटीसी संस्थेचे समन्वयक आणि मुख्य वक्ते चंद्रकांत शर्मा, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, संस्थेचे मानव संसाधन विभागचे विक्रांत वार्डे, कार्यक्रम अधिकारी रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक चंद्रकांत शर्मा यांनी विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, शारीरिक भाषा, पेहराव, स्वपरिचय पत्र लेखन पद्धती कौशल्याची विविध प्रात्यक्षिके शिकवली. ही कौशल्य सादर करत विद्यार्थ्यांची सुसंवाद साधला, तसेच मुलाखती दरम्यान काही विद्यार्थ्यांच्या साहाय्याने प्रात्यक्षिके सादर केली. एकंदरीतच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी इंटरव्यू फेस करण्याची कला या उपक्रमाद्वारे आत्मसात केली.

महाविद्यालयातील एकूण 89 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने पीएनपी स्किल्स अंतर्गत विविध कोर्सेस चालू करण्यात आले आहेत. सदर कोर्सेसमध्ये पीएनपी तसेच इतर सर्व विदयार्थी, नोकरदार वर्ग, उद्योजक, बचत गटातील महिला त्याचप्रमाणे गृहिणी या सर्वांना प्रवेश घेता येणार आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9226987356, 9403094130, 9881041000 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या विभागातर्फे करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रा.पल्लवी पाटील यांनी मानले.

Exit mobile version