लोकसेवा आयोग परीक्षेसाठी व्याख्यानाचे आयोजन

| म्हसळा | वार्ताहर |

वसंतराव नाईक-बॅ.ए.आर.अंतुले महाविद्यालयात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणदान पध्दत या विषयवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी मोठ्या संख्येने युवा वर्गाने गर्दी केली होती. मुंबई येथील कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी कशी करावी. या विषयावर खारघर डायरेक्ट सिद प्रशिक्षण संस्थेचे पंकज बाईत यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालय व्यवस्थापनामार्फत प्रमुख वक्त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर करीअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ.जगदीश शिगवण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख वक्त्यांचा परीचय करुन दिला. पंकज बाईत यांनी आपल्या एक तासाच्या व्याख्यानात दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या ग्रामीण युवक-युवतींचे अनुभव कथनाचे व्हीडीओ दाखविले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेने किती नगण्य आहे. याची जाणीव त्यांनी करून दिली. तसेच त्यामागील कारणे सांगुन त्यावर आपण कशी मात करु शकतो याबाबत देखील मार्गदर्शन केले. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी अभ्यास करताना नित्य दिनक्रम कसा असावा, आपली मनोवृत्ती कशी असावी, एक चांगला नागरिक म्हणून आपले जीवन कसे असावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी विद्यार्थ्यांच्या शकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयातील आयक्युएसी समितीचे समन्वयक सुरेश दुंडे यांनी आभार प्रदर्शन केले. अर्थशास्त्र विषय विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ, फिजिक्स विषय विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र हलोर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अशोक तळवटकर, फजल हळदे, महादेव पाटील, निलम वेटकोळी तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी स्पर्धा परिक्षा आणि करीअर मार्गदर्शन समितीचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version