राज्यस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

। पेण । वार्ताहर ।
पेण येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती’ या विषयावर ऑनलाइन राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 24 जानेवारी रोजी मराठी व हिंदी विषयावरच्या कार्यशाळेत प्राचार्य डॉ. एस.एम. मणेर (तुळजापूर) हे बीजभाषक व हिंदी विषयाचे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी (किनवट-नांदेड) हे मराठीविषयी विवेचन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. बाबासाहेब दुधाळे हे असणार आहेत.
तसेच दि. 25 रोजी वाणिज्य व इतिहास विषयाची कार्यशाळा पार पडणार आहे. दोन्ही दिवशी 10 ते 12 अशी कार्यक्रमाची वेळ असणार आहे. वाणिज्य शाखेबाबत प्रा.एम.एस. लिमण (पाली) हे विषय विवेचन करणार आहेत. इतिहास विषयावर डॉ. अजितकुमार जाधव (नागठाणे-सातारा) हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने होणार असून, राज्यभरातील संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तरी जास्तीत जास्त संशोधकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी केले आहे.

Exit mobile version