बांग्लादेशमध्ये दोन गटात राडा, 91 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बांग्लादेशात रविवारी घडलेल्या हिंसक घटनेत तब्बल 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, आतापर्यंत या हिंसारात शेकडो लोक जखमी झाले आहेत. बांग्लादेशात पुन्हा मोठा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर या घटनेला मोठे हिंसक वळण मिळाले. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले. तसेच, भारत सरकारनंही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच, येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी बांग्लादेशात विद्यार्थी आंदोलक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. तसेच, स्टन ग्रेनेडचा वापर केला. त्यानंतर बांग्लादेश सरकारने रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी कर्फ्यू जाहीर केला होता.

Exit mobile version