चुकीच्या माहितीमुळे आरटीई प्रवेश यादीत गोंधळ

। पेण । वार्ताहर ।
आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांस खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी ऑनलाईन सोडत पुण्यात पार पडली. या सोडतीत निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या पेण तालुक्यातील बारा शाळांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिध्द केली गेली. परंतु काही पालकांनी हेतुपुरस्तर चुकीच्या पध्दतीने आपला राहता पत्ता टाकल्याने ही यादी वादाच्या भवर्‍यात अडकली आहे.

बर्‍याच पालकांनी मुद्दाम चुकीची माहिती पुरवली आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादी मध्ये काही प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांची नाव आढळली आहेत. तसेच या प्राथमिक शिक्षकांनी मुद्दामहुन आपले कागदपत्र चुकीची लावली असून शासनाची दिशाभूल केली आहे. तर काहींनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसिल कार्यालयात चुकीची माहिती देउन उत्पन्न कमी असल्याचे दाखले घेतले आहेत. व ते दाखले आपल्या अर्जा सोबत जोडल्याचे देखील उघडकीस आले आहे. यामध्ये महिन्याला 50 ते 60 हजार रूपये पगार घेणारे पालक देखील आहेत. त्यामुळे खरच आर्थिक दुर्बल घटकांतील पालकांच्या पाल्याला आरटीईमध्ये सवलत मिळत नसून धनदांडग्यांनी चुकीच्या पध्दतीने खोटे कागदपत्र जोडून शासनाची दिशाभूल करत आहेत. या सर्वांन विरूध्द कलम 420 खाली कारवाई करण्याची मागणी पालक वर्ग करत आहेत. तसेच यांना मदत करणार्‍या अधिकार्‍यां विरूध्द देखील कारवाई व्हावी अशी ही मागणी पालक करणार आहेत.

Exit mobile version