उरण वीज कार्यालयाचा सावळागोंधळ

। उरण । वार्ताहर ।
उरण वीज कार्यालयाचा कारभार हा काही अधिकारी वर्गाच्या मनमानीप्रमाणे सुरू आहे. याचा त्रास सर्वसामान्य ग्राहकांना होतो, तर फायदा आर्थिक लागेबांधे असणार्‍यांना होत आहे. उरणमधील वीज मंडळाचे कर्मचारीच बार, हॉटेल, बेकरी, इतर व्यावसायिकांना वीज कनेक्शन चिरीमिरी घेऊन थेट करून देत असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे.
उरणमध्ये मोठं मोठे इमारतींचे टॉवर उभे राहतात आहेत. त्या प्रत्येक टॉवरला स्वतंत्र डीपीची गरज असतानाही ती न देता आर्थिक हितसंबंधातून इतर ठिकाणाहून विजेचा लोड दिला जात आहे. यामुळे विजेचा लोड ओव्हरलोड होऊन वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याची सखोल चौकशी केली तर नक्कीच करोडोचा महाघोटाळा उघडकीस होईल, अशी चर्चा जनतेत सुरू आहे. महावितरण कंपनी ही कर्जाच्या खाईत अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आर्थिकहित संबंधातून झाली आहे. अशा अधिकार्‍याच्या मालमत्तेची चौकशी केली तर त्यांचेही पितळ उघडे पडेल. उरणमधील वीज मंडळाच्या काही अधिकारी वर्गाच्या भ्रष्ट कारभारामुळे वसुली होत नाही. तरी याबाबत लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन उरण वीज मंडळाच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे केली जाणार असल्याचे समजते.

Exit mobile version