पहूर ग्रामपंचायतीच्या आरक्षणावरुन संभ्रम

| सुतारवाडी | वार्ताहर |
पहूर ग्रामपंचायतची आरक्षण सोडत पिठासन अधिकारी श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी तलाठी श्री. केंद्र, ग्रामसेवक मनोज शिंदे, पहूर सरपंच मंगेश कदम, उपसरपंच संतोष धांदरुत, सदस्य तेजस काळोखे, सुप्रिया वाळंज, शरद पवार, ग्रामस्थ शंकर खांडेकर, संदीप जाधव, दत्तात्रेय तांदळेकर, मारुती धनावडे, अंकुश शिंदे, रमेश धनावडे, चेतन वाळंज आदी उपस्थित होते. यावेळी शालेय मुलीच्या हस्ते आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात आली.

प्रभाग क्र. 1 मध्ये पहूर बौद्धवाडी संपूर्ण, खांडेकर वाडी संपूर्ण, ठकेवाडी आदिवासी वाडी संपूर्ण, पहूर आदिवासी वाडी संपूर्ण, अनुसूचित जाती 64, तर अनुसूचित जमाती 220 एवढे असून, प्रभागनिहाय सदस्यसंख्या सर्वसाधारण स्री, सर्वसाधारण स्री आणि सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 मध्ये पहूर मूळगावामधील किसन गणपत लोखंडे यांचे घर ते बाळाराम चंदर धनावडे यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याच्या पश्‍चिमेकडील सर्व भाग अनुसूचित जमाती (स्री) व सर्वसाधारण एकूण लोकसंख्या 325.

प्रभाग क्र. 3 मध्ये एकूण लोकसंख्या 318 एवढी असून, पहूर मूळ गावांपैकी रवींद्र पांडुरंग खोपकर यांचे घर ते रेखा रमेश तांदळेकर यांच्या घरापर्यंत अंतर्गत रस्त्याच्या पूवकडील सर्व. यामध्ये आरक्षण मा.प्र. व सर्वसाधारण (स्त्री).

प्रभाग क्रमांक एकमध्ये आदिवासी समाज येतो. तेथे त्यांचे मतदान आहे. परंतु, प्रभाग क्र. 2 मध्ये आदिवासी समाज नसतानासुद्धा उमेदवार जाहीर झाल्यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.



Exit mobile version