चोराला पकडलेल्या तळा पोलिसांचा सत्कार

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांची छेडछाड करून लूटमार करणार्‍या चोराला तळा पोलिसांनी सापळा रचून पकडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पोलिसांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील चोरीवली, तारणे, कासेखोल येथे सदर चोराने महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची छेडछाड करून लूटमार केली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व गावांतील महिलांमध्ये या चोराबद्दल भीती निर्माण झाली होती.त्यामुळे त्या घराबाहेरही पडायला घाबरत होत्या.अशातच तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या पथकाने सदर चोराला सापळा रचून जेरबंद केले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलिस हवालदार सुरेश पवार, संजय शिंदे यांसह पंचक्रोशीतील ताम्हाणे, माजगाव, गणेशनगर, कासेखोल चोरवली, पन्हेळी, बोरीचा माळ, तळेगाव, मालूक व वांजळोशी गावातील ग्रामस्थ कमिटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version