खालापुरात महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

। खोपोली । प्रतिनिधी ।
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने भारत बंद हाक देताच खोपोली शहर आणि खालापूर तालुक्याच्या वतीने सोमवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील चौकात आंदोलन करीत घोषणाबाजीतून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला.त्यानंतर खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोळी यांना काँग्रेस पक्षाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी खालापूर तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे,खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, युवक अध्यक्ष अँड.संदेश धावारे, ज्येष्ठ नेते कृष्णा पारांगे, सरचिटणीस रायगड जिल्हा कॉग्रेस अशोक मुंढे, शिळफाटा विभाग अध्यक्ष मेहमुद शेख, हायदर फक्की, प्रविण वेदक, जलील कुरेशी, ईरफान शेख, सागर सुखदरे, कुणाल जाधव, श्याम विनेरकर आदीप्रमुखासह मोठ्या कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो

Exit mobile version