काँग्रेसचा वर्धापन दिन

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. या उपक्रमातून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, पक्षाचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवा असे आवाहन काँग्रेसचे उरण शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी यावेळी केले. स्वातंत्र्य काळातील काँग्रेस पक्षाचे योगदान, पक्षाचे महत्व, कार्यकर्त्यांचे त्याग याबाबतीत यांनी उपस्थितांना माहिती दिली.रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यात काँग्रेस कार्यालय येथे उरण तालुका व उरण शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक बबन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी प्रकाश पाटील, देवीदास थळी, अमिना पटेल, चंदा मेवाती, भालचंद्र घरत, गुफरान तुंगेकर, दिलीप जाधव, हितेंद्र घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले.

Exit mobile version