काँग्रेस नेत्‍याचा गौप्यस्फोट

। मुंबई । प्रतिनिधी ।

आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे. त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. येत्या 10 ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतरबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवडणुक पाहता दिली जाईल, असेही चव्हाण म्हणाले.

Exit mobile version