| चिरनेर | वार्ताहर |
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मोदी सरकारचा निषेध करण्याचा निर्धार उरण काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. यासाठी तालुका काँग्रेसने उरण येथे पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, किरीट पाटील, प्रकाश पाटील, सदानंद पाटील, अफशा मुकरी, मार्तंड नाखवा तसेच काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपतर्फे लोकशाहीचा खून होत असून आम्ही काँग्रेस नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही, असे परखड मत इंटकचे रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही भाजप व केंद्र सरकारचा निषेध केला.