मुंबईत काँग्रेसचे आंदोलन

| मुंबई | वृत्तसंस्था |

देशभरात सध्या काँग्रेसचे जोरदार आंदोलन सुरू आहे. देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही निदर्शनं होतायत. दरम्यान, मुंबईतही काँग्रेसची निदर्शनं सुरू आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते आंदोलनात सहभागी होत आहेत.

काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतलं हे आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली आहे.

Exit mobile version