I मुंबई I प्रतिनिधी I
महाविकास आघाडी सरकारमधील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे मंत्री सुद्धा होते. आता काँग्रेस पक्षाने या बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे.
गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या बहुसदस्यीय रचनेच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. महापालिकेत तीन सदस्यांऐवजी दोन सदस्यांचा ठराव काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. काल राज्यमंत्रिमंडळात तीन सदस्य प्रभाग रचनेला मंजुरी देण्यात आली होती. आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत दोन सदस्य प्रभाग रचनेच्या ठरावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.