| पनवेल । वार्ताहर ।
देश लुटणार्या निरव मोदी, ललित मोदींना चोर म्हटले, अदानी महाघोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली म्हणून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असल्याचा आरोप करीत राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणार्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार व पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन व राहुल गांधींच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
याप्रसंगी सुदाम पाटील, कॅप्टन कलावत, नंदराज मुंगाजी, सुरेश पाटील, अखिल अधिकारी, बबन केणी, निर्मल म्हात्रे, सुनील सावर्डेकर, डॉ.धनंजय क्षीरसागर, हेमराज म्हात्रे, शशिकला सिंह, ऍड.अरुण कुंभार, सुधीर मोरे, नित्यानंद म्हात्रे, डॉ.अमित दवे, प्रितेश साहू, अमित लोखंडे, राहुल जानोरकर, किरण तळेकर, भारती जळगावकर, कांती गंगर, डॉ.स्वप्नील पवार, राकेश जाधव, विजय केणी, अरुण ठाकूर, आरती ठाकूर, नीता शेनॉय, ललिता सोनावणे, गोविंद लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.