काँग्रेसच्या राखी प्रभुदेसाईंंचा तृणमूलमध्ये प्रवेश

। पणजी । वृत्तसंस्था ।
गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम करत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
राखी प्रभुदेसाई यांनी गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केला. यानंतर, प्रभुदेसाईंनी ट्विट करत काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केलीय.
ट्विटमध्ये असे नमूद केले आहे की, जड अंतःकरणानं आणि विचारविनिमयानं काँग्रेस पक्ष सोडत आहे, असं नमूद करत राखी यांनी काँग्रेसच्या दिशाहीन नेतृत्वावर देखील ताशेरे ओढलेत. माझ्या राजीनाम्याला काँग्रेसचं नेतृत्वचं जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version