काँग्रेसची महागाईच्या विरोधात आक्रोश रॅली

। खोपोली । प्रतिनिधी ।
देशातील वाढती महागाई आणि त्यास जबाबदार असणार्‍या केंद्र शासनाच्या विरोधात खोपोली काँग्रेसतर्फे जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे. याअंतर्गत आक्रोश रॅली काढण्यात आली.
महागाईचा मुद्दा दिवसेंदिवस जोर धरत असून, त्याविरोधात काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचे चित्र आहे. सर्वसामान्य जनतेचे जीवन कष्टप्रद बनविणार्‍या महागाई विरोधात काँग्रेस पक्षातर्फे जागोजागी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, खोपोलीतही जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
आक्रोश रॅलीच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पूष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहराध्यक्ष रिर्चड जाँन यांचे नेतृत्वाखाली रॅली सुरू करण्यात आली. खोपोली काँग्रेस जनजागरण अभियान मोहीमेच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या व्यथा मांडूना मोदी हटावचा नारा दिला.
यावेळी इंटक कामगार शहराध्यक्ष अरूण गायकवाड, युवा उपाअध्यक्ष संदेश धावारे, महिला शहर अध्यक्षा रेखाताई जाधव, ममता पाणडे, शरिफा शेख, उस्मान शेख, महिराज खान आदिसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version