काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हुसेन दलवाई पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

चिपळूण | प्रतिनिधी |

शहरातील पूरग्रस्त भागाची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पूरग्रस्तांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजुनही शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली. 

चिपळुनात २२ जुलै रोजी महाप्रलय आला आणि चिपळूणवासियांचे होत्याचे नव्हते झाले. पूर ओसल्यानंतर चिपळुनात पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मंत्री, आमदार, नेत्यांचे दौरे सुरू आहेत. यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह प्रदेश सरचिटणीस इब्राहिम दलवाई, शहराध्यक्ष लियाकत शाह, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. पूरग्रस्तांशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप देखील सुरू आहे. पूरग्रस्तांनी शासकीय अजूनही मदत मिळाली नसल्याची भावना व्यक्त केली आहे. ती लवकरच मिळाली पाहिजे, अशी देखील मागणी यावेळी पूरग्रस्तांनी केली.

Exit mobile version