पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत काँग्रेस कार्यकर्त्याची भर दिवसा गोळ्या घालून खून झाल्याची घटना घडली आहे. परिसरात सध्या तणाव निर्माण झाला आहे.
समीर मुनीर मृत्यू झालेल्याचे नाव आहे. काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता तिघांनी दुचाकीवरून येत सहा गोळ्या फायर केल्या. या फायरींगमध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला आहे.

Exit mobile version