चवदार तळ्यांची संरक्षक भिंत खचतेयं?

| महाड | चंद्रकांत कोकणे |
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यामध्ये पुराचे पाणी शिरल्याने तळ्यांतील पाणी दुषित झाले असून तळ्यांतील पाणी काढण्याचे काम प्रशासनाकडून करण्यांत येत आहे. पुराच्या पाण्या बरोबर तळ्यामध्ये साचलेला चिखल काढण्याचे काम देखिल सुरु आहे.चिखल काढल्या नंतर तळ्याच्या पुर्वे कडील भिंतीचे दगड कमकुवत झाल्याचे आढळून आले असुन या बाजुच्या संरक्षक भिती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पालिका आणि शासनाने संरक्षक भिती दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करण्याची आवश्यकता आहे. माजी केद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते तळ्याच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यांत आले होते. कांही वर्षापूर्वी चवदार तळ्याच्या पुर्वे कडील भिंत कोसळली होती,त्या नंतर पालिका प्रशासनाकडून भिंतीच्या दुरुस्तीचे काम करण्यांत आले,परंतु या भिंती लगत असलेल्या रस्त्यावर बेकायदेशी वाहन तळ तयार करण्यांत आल्याने या परिसरांतील तळ्याच्या संरक्षक भिंतीला धोका निर्माण झाला आहे. भिंती लगत अवजड वाहने देखील उभी करण्यांत येत असल्याचे आढळून आल्या नंतर अनेकदा वाहतूक पोलिसां कडे तक्रार देखिल करण्ंयात आली परंतु नागरिकांच्या तक्रारीकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करण्यांत येत असल्याचा आरोप महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केला आहे.प्रशासनाच्या वारंवार बेकायदेशी पार्विैकमुळे भिंतीला धोका असल्याचे निदर्शनाला आणुन दिले असताना देखिल कार्यवाही करण्यांत आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

महाड शहरांमध्ये महापुराचे पाणी चवदार तळ्यांमध्ये गेल्या नंतर पुराच्या पाण्या बरोबर आलेला चिखल देखील मोठ्या प्रमाणांत साचलेला आहे.पाणी देखिल दुषित झाले असुन संरक्षक भिती देखिल पुराच्या पाण्यामुळे कमकुवत झाल्या आहेंत .तळ्यांतील चिखल आणि दुषित पाणी काढण्याचे काम ठाणे महानंगर पालिका आणि महाड नगरपालिका एकत्रीत पणे सुरु असुन बहूतेक पाणी काढून झाले आहे त्याच बरोबर गेल्या दोन दिवसा पासून चिखल काढण्याचे काम सुरु करण्ंयात आले आहे.काम सुरु असताना चवदार तळ्याच पुर्वे कडील भिंतीचे दगड बाहेर निघाले असल्याचे आढळून आले.कांही दगडी कोसळल्या असल्याने भिंत देखिल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाड नगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे नगर अभियंता सुहास कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तळ्यांतील पाणी आणि चिखल काढल्या नंतर त्वरितच भिंतीचे काम हाती घेण्यांत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version