कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी घट सरकार, प्रशासन आणि नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरत आहे. गुरुवारी 1 जुलै रोजी 48 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. 2 जुलै रोजी हा आकडा 46 हजार 617 नोंदवण्यात आला. 3 जुलै रोजी ही संख्या 44 हजार 111 इतकी खाली आल्यानंतर आज चौथ्या दिवशी 43 हजार 071 इतक्या नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नोंदवण्यात आला आहे. गेल्या 24 तासांमधली ही आकडेवारी असून, रुग्णसंख्या हळूहळू घटत असल्याचं यावरून दिसून येत आहे.

मृतांच्या संख्येत वाढ!
दरम्यान, एकीकडे नव्या करोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याआधीच्या 24 तासांमध्ये 738 मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 955 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोना मृतांचा आकडा 4 लाख 2 हजार 005 इतका झाला आहे.

Exit mobile version