। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आज शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी नागाव येथे कै. कृष्णा नथु नाईक यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी भेट दिली. कै. कृष्णा नाईक हे दादा या नावाने विभागाला परिचित होते. स्व.दत्ता पाटील यांच्या सोबत त्यांनी दीर्घकाळ शेकापक्षाचे काम केले. तर, स्व.प्रभाकर पाटील यांचे तर ते निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जात. शेतकरी कामगार पक्षाच्या या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पायाला अडीच वर्षांपूर्वी दुखापत झाल्यापासून ते घरीच असत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. मा.पंडितशेठ यांनी कुटुंबाचे सांत्वन करताना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी, शेकापचे माजी जि.प.सदस्य मा.कबन अण्णा, शेकाप पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, नागाव ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत आठवले, राजाभाऊ म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, केशव नाईक हे उपस्थित होते.