राम मंदिर पाडून बाबरी उभारण्याचा कट

पीएफआयची योजना
| नाशिक | प्रतिनिधी |

पीएफआयला अयोध्येत उभारलं जात असलेलं राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारायची होती. 2047पर्यंत पीएफआयला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन होता, अशी माहिती समोर आलेली आहे. सरकारी पक्षाने नाशिक न्यायालयात ही माहिती दिली.

पीएफआय या संघटनेच्या काही पदाधिकार्‍यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने ताब्यात घेतले आहे. या संघटनेशी संबंधित धक्कादाक खुलासे सुनावणीदरम्यान पुढे येत आहेत. एटीएसने राज्यभर छापे मारुन पीएफआयशी संबंधित पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये मालेगाव येथून एक, कोल्हापूर येथून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेतले. या सर्वांना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने या संशयितांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एटीएसने मात्र अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवली आहे. एटीएसने तपासामध्ये संशयितांकडून हार्डडिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत केली आहेत. विशेष म्हणजे 177 लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. ज्याचा डमिन पाकिस्तानात आहे. शिवाय विविध देशांतील लोक या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमधील चॅटिंग संशयास्पद आणि संवेदनशील असल्याचं पुढे येत आहेत. त्यामुळे न्यायालयाने योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन सरकारी पक्षानं केलं आहे.

Exit mobile version