रसायनीत संविधान चेतना रॅली

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रसायनी । वार्ताहर ।
भारतीय संविधान सन्मान सुरक्षा व संवर्धन अभियानांतर्गत रसायनीमध्ये चांभार्ली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी येथे भारतीय संविधान चेतना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.

या रॅलीत सम्यक सामाजिक संघटना, मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड, भारतीय बौद्ध महासभा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे -क्रांती संघटना युवा प्रकल्पग्रस्त सामाजिक संघटना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समिती रसायनी, मूलनिवासी संघ रायगड जिल्हा, बामसेफ रायगड जिल्हा या संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, चांभार्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सम्यक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली चांभार्ली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन रसायनी अशी पायी घोषणा करत पार पडली. संविधान रॅली पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून संविधान जागृती सभेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सूत्रसंचालन अशोक कवडे व मिलिंद मोहिते यांनी केले. भारतीय बौद्ध महासभा रायगड कमळ कांबळे, मूलनिवासी संघ रायगड जिल्हा अध्यक्ष आशिष जाधव, महावितरण अधिकारी विकास कांबळे, सम्यक सामाजिक संघटना कोषाध्यक्ष सुनील निकाडे, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्ष विश्‍वनाथ मगर, युवा प्रकल्पग्रस्त सामाजिक संघटनेचे सचिव विजय खारकर, बामसेफ महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव अरुण गोडघाटे यांनी संविधान प्रबोधन केले.

Exit mobile version