। कोर्लई । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील तळाशेत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.जयपाल पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष वैशाली भोईटे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, उपशिक्षिका जस्मिन शेख, विद्यार्थी, शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.
यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी तसेच संविधान लिहिण्यास लागलेला काळ व देशातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या कल्याणासाठी संविधान तयार केल्याची माहीती दिली. तसेच यात्रेत व प्रवासात आपल्या आई-बाबापासून दूर अथवा हरविले तर न घाबरता पोलीस मामा अथवा मावशी यांच्याजवळ जावे, अनोळखी सोबत जाऊ नये आणि आपल्या आई-वडील, काका, मामा यांचे मोबाईल क्रमांकाची चिठ्ठी जवळ ठेवावी म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल, असे प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
तळाशेत प्राथमिक शाळेत संविधान दिन
