| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे बुधवार (दि.26) संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून संविधान उद्देशिकेचे वाचन केले. संविधान दिनानिमित्त आर्या मगर,अथर्व भोईर, अनुष्का शिंदे, मिहीर सायगावकर या विद्यार्थ्यांनी तर तन्मयी शिंदे, भूषण सुतार या शिक्षक वृंदानी संविधानाची महत्वाची कलमे, नागरिकांचे मुलभूत हक्क व कर्तव्य यांची सखोल माहिती दिली. तसेच मुळात संविधानाची गरज का आहे या बाबत सविस्तर विवेचन करत संविधान विषयी सखोल माहिती देऊन जनजागृती केली. या कार्यक्रमास प्राचार्य बबन पालवे, जेष्ठ शिक्षक अशोक शिंदे, महेंद्र निकुंभ, नागेश सायगावकर, आकाश ठाकुर, स्वाती शिंदे, तन्मयी शिंदे, सोनल ठकोरे, जयश्री अहिरराव, शामल कंबलकर, विद्या भिसे आदी शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सायगावकर तर आभार महेंद्र निकुंभ यांनी केले.







