| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पंचायत समिती पनवेल कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र कोलटक्के, पशुधन विकास अधिकारी आनंद मारकवर, गटशिक्षण अधिकारी शाहू सतपाल तसेच गुलाब बहिरम सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती पूर्ण स्टाफ उपस्थित होता.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या ठिकाणी संविधान फोटो फ्रेम ठेवण्यात आली होती. गटविकास अधिकारी यांनी संविधानाबाबत आपले विचार व्यक्त केले. चेतन गायकवाड यांनी संविधान शपथ वाचन केले व त्यांच्या मागून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संविधान शपथ घेतली. तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये शहीद झालेल्या शहीद लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.







