पीएनपी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र पाटील, प्रा. पल्लवी पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. नितेश अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रा.रवींद्र पाटील यांनी भारतीय संविधानावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय वक्तव्यात महाविद्यालयाचे  प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी भारतीय संविधानावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि भारतीय राज्यघटनेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान किती बहुमोल आहे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मिलिंद घाडगे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पल्लवी पाटील यांनी मानले.

Exit mobile version