| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पनवेल – इंदापूर महामार्गावर नागोठणे येथे पादचारी पूल उभारला जावा, अशी मागणी शेकापचे माजी आ.पंडित पाटील यांनी सरकारकडे केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मंत्रालयात भेट घेत या मागणीचे पत्रही सादर केले. यावेळी चव्हाण यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
नागोठणेमधूनही महामार्ग जात आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण नागरिकांना सोयीसाठी येथे पादचारी पूल उभारणे गरजेचे असल्याचे पंडित पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणले. यामुळे वाढते अपघात टाळणे शक्य होऊन नागरिकांना येणे जाणे करणे सुलभ होईल,असे ते म्हणाले. दरम्यान, महामार्गाच्या मुद्यावरही चव्हाण यांनी योग्य तो निर्णय घेतल्याबद्दलही पंडित पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.