अलिबाग पोलिसांचा तपास गुलदस्त्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील बांधकाम सेंटरींगच्या प्लेटी रातोरात गायब करण्यात आल्या होत्या. दरम्यान, या प्लेटी एका भंगार विक्रेत्याकडे आढळून आल्याचे बोलले जात आहे. मात्र, अलिबाग पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात आली नसून, त्यांचा तपासच अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या मागील खरा सुत्रधार कोण, सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरातून काही महिलांनी सेंटरींगच्या प्लेटी गायब केल्या होत्या. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांसह हवालदारांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यावेळी काही महिला बांधकाम सेंटरींग प्लेटी घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर या प्लेटी त्या कुठे घेऊन गेल्या, याचा शोध सुरु करण्यात आला. अखेर एका भंगारवाल्याकडे या प्लेटी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तपासिक विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भंगारवाल्याला चौकशीसाठी बोलावले. मात्र, सेंटरींग प्लेटी लंपास करणाऱ्या महिलांसह भंगार विक्रेत्यांचा तपास अद्यापर गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तपासात संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सेंटरींग प्लेटी चोरणाऱ्या महिलांचा शोध सुरु असल्यामुळे भंगार व्रिकेत्यांविरोधात कारवाई करून शकत नाही. त्यामुळे तपास विभागाने नक्की कशासाठी कारवाईची हालचाल सुरु केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
