बांधकाम साहित्य चोरट्यांना अटक

| नेरळ | प्रतिनिधी |

आरडे येथील बांधकाम साईटवरून साधारण एक लाखाच्या किमतीचे बांधकाम साहित्याची चोरी झाली होती. संबंधित चोरट्यांचा तपास सीसी टीव्ही फुटेजच्या माध्यमातून घेण्यात नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. चोरी करणार्‍या तीन चोरट्यांना मुद्देमालसह ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नेरळ पोलिस ठाण्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरडे येथे यशवंत काथोद देसले यांच्या बांधकाम साईटवरून सुमारे 52 लोखंडी सेट्रींगच्या प्लेट असा, सुमारे 1,04,000 रूपये किंमतीचा माल चोरीला गेला होता. त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करताना यशवंत देसले यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींवर नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला होता. सदरचा गुन्हा हा पोलीस स्टेशनपासून सुमारे 15 किमी अंतरावर घडल्याने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करणे. हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेरळ पोलीसांनी अंबरनाथ येथून तीन आरोपींना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्या तिघा आरोपींना पोलीसांनी चौकशीकरीता ताब्यात घेतले असता त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. फारूख नुरमोहम्मद शहा, सलमान आयात उल्ला शहा आणि शहजाद अब्दुल सलाम भट यांना अटक करून न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नेरळ पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उप निरीक्षक सरगर, पोलीस शिपाई दवणे, वांगणेकर तसेच सहायक फौजदार श्रीरंग किसवे, पोलीस हवालदार म्हात्रे, खंडागळे यांनी गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version